Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आजपासून रेड, कंटेनमेंट वगळता ‘या’ जिल्ह्यात धावणार लालपरी

आजपासून रेड, कंटेनमेंट वगळता ‘या’ जिल्ह्यात धावणार लालपरी
मुंबई , शुक्रवार, 22 मे 2020 (07:06 IST)
चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरू झाला असून राज्य सरकारने यासाठी नवी नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार रेड आणि कंटेनमेंट क्षेत्र वगळता राज्यातील इतर भागात आजपासून अर्थात २२ मे पासून जिल्हा अंतर्गत एसटी बससेवा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍड अनिल परब यांनी दिली आहे.
 
लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी करत केवळ रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता इतर जिल्ह्यांना सशर्त एसटी महामंडळाला केवळ जिल्हा अंतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा  सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यांतील निवडक मार्गांवर शुक्रवारपासून एसटी बससेवा सुरू होणार असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. यासाठी काही नियम देखील जारी करण्यात आले आहेत.
   
असे आहेत नियम 
जिल्हाअंतर्गत सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही बस सेवा सुरू राहील.
प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल.
जेष्ठ नागरिक व १० वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून ) 
प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.
प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करोना संसर्गाने पुण्यातील कॉन्स्टेबलचा मृत्यू