Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाचा, कोरोनाचा धोका सर्वाधिक कोणाला?

वाचा, कोरोनाचा धोका सर्वाधिक कोणाला?
, मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (08:48 IST)
कोरोनावर उपचार करणाऱ्या जगभरातील अनेक आरोग्यक्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टर्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत जागितक आरोग्य संघटना (WHO) च्या तज्ज्ञांनी दातांच्या डॉक्टरर्सना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. WHO वाढत्या संक्रमणात डॉक्टरांकडून रुटीन चेकअप करताना स्वतःचा बचाव करण्याचा सल्ला दिला आहे. या महामारीचा धोका सर्वाधिक दातांच्या डॉक्टरांना असल्याचे WHO ने म्हटले असून त्यांनी याकरता काही नियमावलीदेखील आखून दिली आहे.
 
WHO ने दिलेली नियमावली
रुग्णांचे रुटीन चेकअप करताना काळजी घेणे
जोपर्यंत कोरोनाचा प्रभाव कमी होत नाही तोपर्यंत रुग्णांची ओरल ट्रीटमेंट न करणे
जर आपतकालीन स्थिती उद्भवत असेल तर रुग्णांना व्हिडिओ कॉन्फरेंसिंगद्वारे सल्ला देणे
WHO ने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरर्स सध्या संक्रमणाच्या हायरिस्क झोनमध्ये आहे. अशा स्थितीत दातांसंबंधी समस्यांचा उपचार करत असताना लाळेत असलेल्या व्हायरसमुळे संक्रमण पसरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोणत्याही मार्गातून व्हायरसची लागण होऊ शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

समुद्र, तलावावर नागरिकांना थेट गणेश विसर्जन करण्यास सक्त मनाई