Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 6 April 2025
webdunia

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर, एकाच दिवशी चक्क 359 कोरोना पॉझिटिव्ह

Havoc of corona
, गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (16:51 IST)
अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, एकाच दिवशी चक्क 359 कोरोना पॉझिटिव्ह आढळले.  गेल्या आठवड्याभरापासून दररोज 200 च्या वर कोरोना रुग्ण आढळत असल्याने खळबळ उडालीय. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पाऊले उचलणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाने केलेय. तर जिल्ह्यातील गुरुदेवनगर ग्रामपंचायतीने आठवडी बाजार बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. 
 
 या गंभीर परिस्थितीचे अवलोकन करता आता प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या दिशेने तर नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासन नियमांचे पालन करीत आवश्यक ती पावले उचलणे गरजेचे आहे. आजपासून ग्रामीण भागात कोरोना तपासणी शिबिर सुरू करण्यात आले आहे, तर गुरुदेवनगर गावात अलर्ट घोषित करण्यात आलाय. इथल्या बाजारपेठा बंद करण्यात आल्यात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केरळहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य