Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 28 April 2025
webdunia

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण

Health Minister
, शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (07:47 IST)
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
विशेष म्हणजे गुरुवारी दिवसभरात राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज समोर आली. त्यानंतर रात्री उशिरा राजेश टोपे यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उन्नाव पीडितेला एयरलिफ्टने मुंबई पाठवा यूपी सरकारला नितीन राऊत ह्यांची मागणी