Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरच्या घरी अशी करा corona test

घरच्या घरी अशी करा corona test
, गुरूवार, 29 जुलै 2021 (18:41 IST)
कोरोनाची चाचणी करण्यासाठी आता लॅबमध्ये जाण्याची गरज नाही कारण आता घरच्या घरी ही टेस्ट करणं शक्य होणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या तीन किट्सना इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं मान्यता दिली आहे. 
 
किट्स बाजारात उपलब्ध होत असून त्याचा उपयोग करून आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे लगेच कळू शकेल. आता रॅपिड अँटी जण टेस्ट किट आपल्याला 250 रुपये मिळणार आहे त्यामुळे आपण घरी सुद्धा चाचणी करू शकता.
 
कोविसेल्‍फ (पॅथोकॅच) कोविड 19 ओटीसी एंटीजन एलएफ डिव्हाइस, पॅन बायो कोविड 19 एँटिजन रॅपिड टेस्‍ट डिव्हाइस आणि कोविफाइन्‍ड कोविड 19 रैपिड एज सेल्फ टेस्‍ट अशी ICMR ने मान्यता दिलेल्या 3 किट्सची नावं आहेत. ही किट्स सध्या देशाच्या विविध भागात उपलब्ध असून त्याचा उपयोग करून घरबसल्या कोरोनाची टेस्ट करणं शक्य होणार आहे.
 
या किटचा उपयोग करून कोरोनाची टेस्ट करता येणार असून तपशील ICMR लाही समजतात. ICMR अॅपवर याचे निकष अपलोड होणार. त्यानंतर काही मिनिटांमध्ये टेस्टचा रिपोर्ट येईल. मात्र आयसीएमआरला डिटेल्स सबमिट केल्याशिवाय टेस्टचा निकाल समजू शकत नाही. रुग्णाला घराबाहेर पडावं न लागता ही चाचणी व्हावी तसेच कोरोना पॉझिटिव्ह असतानादेखील ही बाब लपवून ठेवण्याची शक्यता कमी करण्यासाठी आयसीएमआरकडे त्याचे तपशील पाठवण्याची तरतूद या किट्समध्ये करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र १ ऑगस्टपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता