Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, खाजगी रुग्णालयात सिटी स्कॅनचे दर निश्चित करणार

webdunia
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (16:34 IST)
खासगी रुग्णालयात सिटी स्कॅनचे दर निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा आणि परवडणाऱ्या दरांमध्ये सिटी स्कॅन HRCT चाचणी खासगी रुग्णालयात मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
कोविड १९ च्या निदानासाठी सिटी स्कॅन अर्थात HRCT चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. खासगी रुग्णालयांमध्ये या चाचणीसाठी १० हजारांपेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आलं आहे. त्यामुळे दर निश्चितीसाठी समिती गठीत करण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतल्याचं राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे. याशिवाय  राज्य सरकारने मास्क आणि सॅनिटायजर यांचे दर कमी करण्याचाही निर्णय घेतला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

जर तुमचा मुलगाही फासावर लटकलेला मिळाला तर ... कंगना रनौतची जया बच्चन यांच्यावर जोरदार टीका