Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाच्या उपचारात स्टिरॉइडचा चुकीचा वापर केल्याने मानसिक संतुलन बिघडतंय: मानसोपचारतज्ज्ञ

कोरोनाच्या उपचारात स्टिरॉइडचा चुकीचा वापर केल्याने मानसिक संतुलन बिघडतंय: मानसोपचारतज्ज्ञ

विकास सिंह

, शुक्रवार, 14 मे 2021 (15:24 IST)
भोपाळ- कोरोना संसर्गग्रस्तांच्या उपचारासाठी वापरण्यात येत असलेल्या स्टिरॉइड्सचे दुष्परिणाम आता रूग्णांवर पाहायला मिळत आहेत. डॉक्टरांच्या सल्ला न घेता स्टिरॉइड घेणार्‍यांचे मानसिक संतुलन बिघडण्याच्या घटना समोर येत आहेत. मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळ येथे या प्रकाराचे अनेक प्रकरणं समोर आले आहे असे म्हणणे आहे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. सत्यकांत त्रिवेदी यांचे.
 
वेबदुनिया’ शी बोलताना डॉक्टर सत्यकांत त्रिवेदी म्हणतात की सध्या कोरोनाच्या उपचारात स्टिरॉइड्स महत्वाची भूमिका निभावतात. अशा परिस्थितीत असे दिसून येत आहे की लोक स्वत:, इतरांच्या सल्ल्याने किंवा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले मेसेजमुळे प्रभावित होऊन स्टिरॉइड्स घेत आहेत. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय स्टिरॉइड्स घेतल्यामुळे लोकांचे मानसिक संतुलन बिघडत आहे.
 
ते म्हणतात की मागील आठवड्यात त्याच्याकडे असे पंधरा ते वीस रुग्ण आले ज्यांचं मानसिक संतुलन बिघडण्याचे कारण स्टिरॉइड्सचा चुकीचा वापर होता. या रुग्णांशी बोलताना असे निष्पन्न झाले की स्वतःच्या मनाने किंवा कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय स्टिरॉइड्स घेत होते.
 
स्टिरॉइड साइड इफेक्ट्सची लक्षणे- 'वेबदुनिया' शी चर्चा करताना डॉक्टर सत्यकांत त्रिवेदी म्हणतात की स्टिरॉइड्सचे बरेच दुष्परिणाम आहेत जसे झोप न येणं, सामान्यपेक्षा अधिक एनर्जी जाणवणे किंवा अगदीच अलिप्त रहाणे. तसंच स्टिरॉइडचा चुकीचा वापर राग, आक्रमकता किंवा स्वतःला इजा करण्याचा विचार देखील देतात.
 
'वेबदुनिया' द्वारे डॉ. सत्यकांत त्रिवेदी यांनी लोकांना केवळ डॉक्टरांशी सल्लामसलत करूनच स्टिरॉइड्स घेण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की सोशल मीडियावर किंवा दुसर्‍याच्या सल्ल्यावर स्टिरॉइड्स अजिबात घेऊ नका फक्त डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्टिरॉइड्स वापरा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WhatsAppची नवीन पॉलिसी काय आहे ते जाणून घ्या, आपण न स्वीकारल्यास उद्यापासून बरेच फीचर्स कार्य करणे थांबवतील