Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

राज्यात ७ हजार ३४५ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले

राज्यात ७ हजार ३४५ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले
, मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (11:05 IST)
राज्यात सोमवारी ७ हजार ३४५ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत एकूण १७ लाख ३० हजार ७१५ कोरोना रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.२८ टक्के इतका झाला आहे. तर ३ हजार ७५ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात  ४० कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १३ लाख १८ हजार ७२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ५५ हजार ३४१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५५ हजार १८० व्यक्ती होम क्वारंटाइन झाले आहेत. तर ५ हजार ५६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७५ हजार ७६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर  कोरोना बाधितांची एकूण संख्या १८ लाख ५५ हजार ३४१ इतकी झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण ज्येष्ठ नागरिकांचे