Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंगापूर युनिव्हर्सिटी सांगत आहे कधी कोरोना संकट संपणार

सिंगापूर युनिव्हर्सिटी सांगत आहे कधी कोरोना संकट संपणार
, बुधवार, 29 एप्रिल 2020 (16:52 IST)
सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी ऍन्ड डिझाइनच्या (SUTU)संशोधकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने जगभरातील कोरोना प्रकरणांचं विश्लेषण केल्यानंतर, 131 देशांमध्ये कोणत्या देशात कोरोना कधी संपू शकतो, याबाबत सांगितलं आहे.
 
संशोधकांनी यासाठी ISR (susceptible-infected-recovered)मॉडेलचा वापर केला आहे, जो या माहामारीच्या जीवनचक्रापासून ते त्याच्या अंतापर्यंतचा अंदाज लावू शकतो. जगभरातील कोरोना रुग्णांची माहिती ऑवर वर्ल्ड इन ourworldin या वेबसाईटवरुन घेण्यात आली आहे. 
 
या गणितीय मॉडेलिंगच्या माध्यमातून यूनिव्हर्सिटीने असा अंदाज वर्तवला आहे की, जगभरातून कोरोना व्हायरस 21 मेपर्यंत 97 टक्क्यांपर्यंत संपेल. तर 8 डिसेंबर 2020 पर्यंत 100 टक्के संपणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 
 
तर दुसरीकडे बहरीन आणि कतरसहित काही देशांमध्ये फेब्रुवारी 2021 मध्ये कोरोनाची नवीन प्रकरणं समोर येऊ शकतात.
 
संशोधकांनी त्यांच्या अंदाजाच्या कालावधीत बदल होण्याचीही शक्यता असल्याचं स्पष्ट केलं आहे. 
 
कोरोना रुग्णांची आकडेवारी दररोज अपडेट केली जाते. हे विश्लेषण आणि अंदाज केवळ शैक्षणिक आणि संशोधनाच्या उद्देशाने करण्यात येत असल्याचं‘ऑवर वर्ल्ड इन’या वेबसाईटकडून सांगण्यात आलं आहे. 
 
अभ्यासानुसार खालील देशांमध्ये कोरोना विषाणूचा शेवट असा होऊ शकतो -
- भारत - 21 मे
- अमेरिका - ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (11 मेपर्यंत 97 टक्के)
- इटली - ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात (7 मेच्या आसपास 97 टक्के)
- ईराण - 10 मे
- तुर्की - 15 मे
- यूके - 9 मे
- स्पेन - मे महिन्याच्या सुरुवातीला
- फ्रान्स - 3 मे
- जर्मनी - 30 एप्रिल

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘वर्क फ्रॉम होम‘ करण्यास 31 जुलैपर्यंत सूट