भारताच्या कोरोना लसीची मागणी वाढत असून आता भारत आणखी 49 देशांना वॅक्सीन पुरविणार आहे. परराष्ट्र मंत्रालयानुसार लॅटिन अमेरिका, कॅरिबियन देश, आशिया आणि आफ्रिका खंड या देशांसह अनेक देशांना कोरोना लस पुरवण्याची योजना आहे. विशेष म्हणजे ही लस विनामूल्य उपलब्ध करुन दिली जाईल.
गरीब देशांना कोट्यवधींच्या लस दिल्याबद्दल जगभरात भारताचं कौतुक होत आहे. भारत सरकारने अलीकडेच नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, सेशेल्स आणि मालदीव या देशांना लस पुरवल्या किंवा विकल्या आहेत. भारताने आता "लस फ्रेंडशिप" अंतर्गत 22.9 दशलक्ष लसांचे वाटप केले असून त्यापैकी 64.7 लाख लस अनुदान म्हणून देण्यात आल्या आहेत.
भारतानं केलेल्या या लसींच्या वाटपाचं जगभरातून कौतुक होत आहे. भारतानं सीरम इनस्टिट्यूटनं विकसित केलेली कोविशील्ड आणि भारत बायोटेकनं विकसित केलेल्या लसीच्या आपात्कालीन वापरास मान्यता दिली आहे. जगभरात होणाऱ्या लसींच्या निर्मितीपैकी 60 टक्के निर्मिती ही भारतात होत असते.