Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशाच्या भवितव्यासाठी 'मोदी सिस्टम 'जागृत करणे आवश्यक आहे -राहुल गांधी

देशाच्या भवितव्यासाठी 'मोदी सिस्टम 'जागृत करणे आवश्यक आहे -राहुल गांधी
, मंगळवार, 18 मे 2021 (20:32 IST)
कोरोना व्हायरस संसर्गाची परिस्थिती पाहता कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि ते म्हणाले की, या सरकारमध्ये प्रश्नकर्त्यांना जेवढ्या सहजतेने अटक केली जाते, ही लस तेवढ्या सहज सापडली असती तर आज देशात  ही भयावह स्थिती झाली नसती. 
ते म्हणाले की देशाच्या भवितव्यासाठी 'मोदी सिस्टम' झोपेतून जागृत करणे आवश्यक आहे.कॉंग्रेस नेत्याने ट्विट केले की मोदींच्या 'सिस्टम' मध्ये प्रश्न करणाऱ्यांना जेवढ्या सहजतेने अटक केली जाते, तेवढ्याच सहज पद्धतीने लस मिळाली असती तर आज हे भयावह दिवस समोर आले नसते. आणि देशाची ही स्थिती झाली नसती. कोरोना थांबवा ,लोकांचे प्रश्न नाही!
आगामी काळात मुलांना कोरोनापासून वाचवावे लागेल, असेही राहुल गांधी म्हणाले. बालरोगविषयक आरोग्य सुविधा आणि लसी-उपचार प्रोटोकॉल आतापासून तयार असावेत. देशाच्या भवितव्यासाठी सध्याच्या  मोदी 'सिस्टम ' झोपेतून जागृत करणे आवश्यक आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तौक्ते चक्रीवादळ: नौदलाने 3 जहाजांच्या मदतीने विशेष ऑपरेशन करून अडकलेल्या 146 लोकांचे प्राण वाचविले