Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र एकमेव राज्य जिथे कोरोना व्हायरसने तब्बल 47 वेळा रंग बदलला

महाराष्ट्र एकमेव राज्य जिथे कोरोना व्हायरसने तब्बल 47 वेळा रंग बदलला
, मंगळवार, 8 जून 2021 (16:09 IST)
कोरोना व्हायरसच्या म्युटेशनबाबत संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे कोरोना व्हायरसने तब्बल 47 वेळा आपला रंग बदलला आहे.संशोधकांचं म्हणणं आहे की, जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ही अतिशय घातक असेल. या अभ्यासात समोर आलं आहे की, महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये कोरोना व्हायरसचा धोका आहे. 
 
महाराष्ट्रात याबाबत संशोधन केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात नागरिकांमध्ये नवनवे वेरिएंट असल्याचे उघडकीस झाले. या दरम्यान प्लाझ्मा, रेमडेसिविर आणि स्टेरॉयडयुक्त औषधांचा अति वापर केल्यामुळे म्युटेशनमध्ये वाढ झाली आहे. 
 
पुण्याताली नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वॉयरोलॉजी (एनआयवी), भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) आणि नवी दिल्लीतील नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (एनसीडीसी) यांच्या संयुक्त संशोधानात महाराष्ट्राचा समावेश आहे. देशातील सर्वाधिक कोरोना संक्रमणाचा धोका गेल्या 1 वर्षात महाराष्ट्रालाच झाला आहे. एनआयवीमधून डॉ. प्रज्ञा यादव यांनी सांगितले की, गेल्या फेब्रुवारी महिन्यात कोरोना व्हायरसच्या एस प्रोटीनमध्ये सर्वाधिक म्युटेशन पाहायला मिळाले. आता एक एका म्युटेशनबाबत माहिती जमा केली जात आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फडणवीस यांची खोचक प्रतिक्रिया, केंद्राकडे बोट दाखवायचं, ती योग्य प्रथा नाही