Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जमातच्या मौलाना सादचा ठावठिकाणा सापडला?

जमातच्या मौलाना सादचा ठावठिकाणा सापडला?
नवी दिल्ली , गुरूवार, 9 एप्रिल 2020 (13:18 IST)
दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलिगी जमात मरकज प्रकरण उघडकीस आल्यानंतर फरार झालेल्या मौलाना सादचा ठावठिकाणा पोलिसांना लागला, अशी माहिती मिळते. मौलाना साद हा सध्या त्याच्या दिल्लीच्या झाकीरनगर भागातील निवासस्थानी क्वारंटाइन असल्याचे समजते.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकड्यानुसार, देशातील कोरोनाबाधितांची संख्या 5194 वर पोहोचली. यामध्ये, 70 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. 149 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर आतापर्यंत 402 जणांवर उपचार यशस्वी ठरलेले दिसत आहेत. या रुग्णांमध्ये मरकजला हजेरी लावणार्‍या नागरिकांची संख्या अधिक असल्याचेही निदर्शनास येते.

सूत्रांच्या माहितीनुसार, ठावठिकाणा समजला असला तरी दिल्ली पोलीस मात्र लगेचच त्याची चौकशी करण्याची किंवा त्याला ताब्यात घेण्याची घाई करणार नाहीत. जमातशी निगडित अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे   मौलाना साद स्वतःदेखील कोरोनाबाधित असू शकतो, असा संशय आहे. त्यामुळे, दिल्ली पोलीस मौलाना सादचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची चौकशी करणार आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी मौलाना सादकडे काही कागदपत्रांची मागणी केली. याच दरम्यान निजामुद्दीनस्थित मरकजमधून 6-7 रजिस्टरदेखील जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये मरकजमध्ये सहभागी झालेल्या देशी-परदेशी नागरिकांच्या नावांचा आणि माहितीचा समावेश आहे. याचसोबत मरकजमध्ये सहभागी झालेल्या कांचीही चौकशी करण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आमिरने दिली गुप्त देणगी