Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाचा नव्या व्हेरियंट XE चा भारतात शिरकावं, जाणून घ्या व्हायरसची लक्षणे काय आहेत

covid
, बुधवार, 6 एप्रिल 2022 (20:09 IST)
कोरोना विषाणूच्या नवीन XE व्हेरियंटने भारतात दार ठोठावले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत XE व्हेरियंटचे  पहिले प्रकरण समोर आले आहे. WHO च्या मते, XE व्हेरियंट हे ओमिक्रॉन व्हेरियंटतील BA.1 आणि BA.2 या दोन प्रकारांचे संयोजन आहे. या व्हेरियंट वरील प्राथमिक संशोधन सूचित करते की हे ओमिक्रॉनपेक्षा 10 टक्के जास्त संसर्गजन्य असू शकते. या वर्षी 19 जानेवारी रोजी यूकेमध्ये XE व्हेरियंटचे पहिले प्रकरण आढळून आले. 
 
आता मुंबईतील पहिल्या प्रकरणाची पुष्टी झाल्यानंतर भारतातही या व्हेरियंटची प्रकरणे वाढण्याचा धोका आहे. XE व्हेरियंट थायलंड आणि न्यूझीलंडमध्ये देखील आढळले आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की त्याच्या म्युटंट बद्दल अधिक सांगण्याआधी अधिक डेटा आवश्यक आहे. मुंबईत पहिले प्रकरण आढळल्यानंतर  या प्रकाराची लक्षणे जाणून घेणे आवश्यक झाले आहे.
 
ओमिक्रॉन XE ची लक्षणे काय आहेत?
* जोपर्यंत त्याची लक्षणे आणि तीव्रता संबंधित आहे, काहींमध्ये सौम्य लक्षणे असू शकतात आणि काही प्रकरणे गंभीर असू शकतात.
* या विषाणूची तीव्रता मुख्यत्वे लसीकरणावर अवलंबून असते. ज्यांना लसीकरण करण्यात आले आहे त्यांना सौम्य लक्षणे दिसू शकतात. लसीकरण नसलेल्यांमध्ये लक्षणे गंभीर असू शकतात.
* XE व्हेरियंटच्या लक्षणांमध्ये ताप, घसा खवखवणे, खोकला आणि सर्दी, त्वचेची जळजळ, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इत्यादी त्रास संभवतात.
*  XE अधिक गंभीर असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नाही, आतापर्यंत ओमिक्रॉन चे सर्व व्हेरियंट कमी गंभीर असल्याचे दिसून आले आहे.
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी