Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास महाराष्ट्रातीलपुणे येथे 136 जणांची ‘हजेरी’

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास महाराष्ट्रातीलपुणे येथे 136 जणांची ‘हजेरी’
, बुधवार, 1 एप्रिल 2020 (16:16 IST)
दोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लोकांमुळे कोरोनाचे लोण दिल्लीसह देशातील अनेक राज्यात गेले आहे.तर विशेष म्हणजे या संमेलनात सहभागी झालेल्यांपैकी किमान 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. तर 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन झाले आहे. आणखी 200 जणांमध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसून आली आहे. त्यातील 121 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तीमुळे  देशात खळबळ उडाली आहे. 21 राज्यातील 10 हजार लोकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे देशभरात पसरलेल्या या प्रचारकांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. देशात खळबळ उडाली आहे.
 
दिल्लीत या कार्यक्रमासाठी आलेल्या 250 परदेशी नागरिकांपैकी किमान 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील 136 जण सहभागी झाले होते. त्यातील 30 जण पुण्यातील असून 3 जण पिंपरी आणि 3 जण जिल्ह्यातील आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे शहर व जिल्ह्यात किमान 40 जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हे सर्व जण अजूनही पुढे येत नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यामध्ये अडचणी येत आहे. 
 
त्यांच्यातील 36 जणांना शोधण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 5 जणांना या अगोदरच क्वारंटाईन करण्यात आले आहे.
 
तामिळनाडुतील 50 जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यातील 45 जणांचा दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशात 156, तामिळनाडुमधील 501, आसाममधील 216, मध्य प्रदेशातील 107, तेलंगणा 55, कर्नाटक 45, झारखंड 46, पश्चिम बंगाल 73, उत्तराखंड 34 अशा विविध राज्यातील प्रचारक आपापल्या राज्यात गेले असून ते आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे त्यांना लागण झाली का व त्यातील काही जणांना लागण झाल्याचे आढळून आल्यास ते आणखी किती जणांच्या संपर्कात आले. त्यांनी तो इतरांमध्ये पसरविला आहे का याची तपासणी करण्याची गरज आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील आरोग्य विभाग आणि पोलिसांना मोठी शोध मोहीम हाती घ्यावी लागली आहे. कोल्हापूरमधील 21 जण या कार्यक्रमात सहभागी झाले असून त्यातील 6 जणांचा शोध घेण्यात येऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!