Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घाबरण्याची गरज नाही, करोना प्राण्यांमुळे पसरत नाही

घाबरण्याची गरज नाही, करोना प्राण्यांमुळे पसरत नाही
, बुधवार, 5 मे 2021 (10:50 IST)
हैदराबादच्या नेहरू जूलोजिकल पार्कच्या 8 8 एशियाटिक सिंहांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर लोकांच्या मनात भीती वाढली आहे. तसं तर कोरोनाचा संसर्ग हा प्राण्यांपासून मानवांमध्ये किंवा मानवांपासून जनावरांपर्यंत पसरत नसल्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.
 
वरिष्ठ वेटरनरी सर्जन डॉ. प्रशांत तिवारी यांनी सांगितले की प्राण्यांचे दोन प्रकार असतात. एक कॅनाइल तर दुसरे फॅलाइन. कॅनाइलमध्ये कुत्रे, लांडगे येतात तर फॅलाइनमध्ये सिंह, मांजरी येतात. प्राण्यांना देखील कोरोनाची लागण होते, परंतू मनुष्याच्या आणि जनावरांच्या कोरोनामध्ये फरक आहे. जनावरांमध्ये अल्फा टाइप कोरोना होतो जेव्हाकि मनुष्याला बीटा टाइपचा. तिवारी यांनी म्हटले की आतापर्यंत मानवाकडून प्राण्यांना किंवा प्राण्यांमुळे मनुष्याला कोरोना संसर्ग होण्याची एकही घटना घडलेली नाही. 
 
डॉ. तिवारी म्हणतात की गेल्या वर्षी मांजरींमध्ये कोरोना संसर्गाच्या घटना घडल्या होत्या मात्र सिंहांमध्ये संक्रमणाची ही पहिलीच घटना आहे. मात्र अन्वेषण करण्यापूर्वी संसर्गाचा स्त्रोत काय हे सांगणे अवघड आहे. ते म्हणाले की, सिंहांमध्ये सापडलेला कोरोना स्ट्रेन ह्यूमन आहे वा एनिमल हे अद्याप तपासण्याच्या विषय आहे.
 
ते म्हणाले की कोणत्याही परिणामापर्यंत पोहचेपर्यंत पॅनिक होण्याची गरज नाही. तथापि, ते असे म्हणतात की सिंह एक मांजरीची प्रजाती आहे. म्हणून, जे लोक घरात मांजरी ठेवतात त्यांनी जरा काळजी घेतली पाहिजे. या प्रकाराचे कोणतेही लक्षणं आढल्यास ते वैद्यकीय सल्ला घेऊ शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

RT-PCR टेस्‍ट दुसर्‍यांदा करु नये, कोरोना चाचणीवर ICMR ची नवी एडवाइजरी