Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात ओमिक्रॉनचे 68 नवी रुग्ण

राज्यात ओमिक्रॉनचे 68 नवी रुग्ण
, मंगळवार, 4 जानेवारी 2022 (08:49 IST)
राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना ओमिक्रॉनचे  रुग्ण आढळून येत आहेत. ओमिक्रॉनचे रुग्णांची  संख्या मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमवीर राज्य सरकारकडून (Maharashtra Government) कडक निर्बंध लावले जाण्याचे संकेत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी दिले आहे. आज राज्यात 68 नवीन ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत.
आज राज्यात आढळून आलेल्या 68 नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. मुंबईत आज 40 रुग्ण आढळून आले आहेत. तर पुणे (Pune PMC) – 14, नागपूर (Nagpur) – 4, पुणे ग्रामीण (Pune Rural), नवी मुंबई (Navi Mumbai), रायगड (Raigad) आणि सातारामध्ये (Satara) प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. राज्यात आजपर्यंत 578 रुग्ण आढळून आले असून 259 ओमिक्रॉन बाधित (Omicron Variant)  रुग्ण बरे झाले आहेत.
 
राज्यात कुठे किती ओमिक्रॉन रुग्ण?
1. मुंबई – 368 रुग्ण
2. पुणे महापालिका – 63 रुग्ण
3. पिंपरी-चिंचवड – 36 रुग्ण
4. पुणे ग्रामीण – 26 रुग्ण
5. ठाणे – 13 रुग्ण
6. पनवेल – 11 रुग्ण
7. नागपूर – 10 रुग्ण
8. नवी मुंबई – 9 रुग्ण
9. कल्याण डोंबिवली, सातारा – प्रत्येकी 7 रुग्ण
10. उस्मानाबाद – 5 रुग्ण
11. वसई विरार – 4 रुग्ण
12. नांदेड – 3 रुग्ण
13. औरंगाबाद, बुलडाणा, भिवंडी, मिरा भाईंदर, सांगली, कोल्हापूर – प्रत्येकी 2 रुग्ण
14. लातूर, अहमदनगर, अकोला, रायगड – प्रत्येकी 1 रुग्ण

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावणेतीन लाख मीटर नायलॉन मांजा जप्त