Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लसीकरणाच्या चौथ्या दिवशी ९२ टक्के कर्मचाऱ्यांनी घेतली लस

लसीकरणाच्या चौथ्या दिवशी ९२ टक्के कर्मचाऱ्यांनी घेतली लस
, शनिवार, 23 जानेवारी 2021 (07:59 IST)
लसीकरणाच्या चौथ्या दिवशी ३५३९ म्हणजेच ९२ टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी हजेरी लावली. सर्वाधिक लसीकरण जोगेश्वरी येथील ट्रॉमा सेंटर आणि घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात झाले.
 
गेल्या शनिवारपासून मुंबईतील लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे ही मोहीम दोन दिवस स्थगित केल्यानंतर पुन्हा मंगळवारपासून सुरू करण्यात आली. मात्र कोविन ॲपमधील गोंधळ, कर्मचाऱ्यांमध्ये भीती आदींमुळे दररोज चार हजार कर्मचाऱ्यांना लस देण्याची मोहीम फोल ठरत होती. त्यामुळे तीन दिवसांत केवळ पाच हजार २५१ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले होते. 
 
त्यामुळे लसीकरणाविषयीची कर्मचाऱ्यांमधील भीती घालवण्यासाठी पालिकेने समुपदेशन सुरू केले. त्याचबरोबर नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही केंद्रावर लस घेण्याची सूट देण्यात आली. याचे चांगले परिणाम चौथ्या दिवशी दिसून आले. शुक्रवारी ३८५२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी बोलावण्यात आले होते. यापैकी तीन हजार ५३९ कर्मचाऱ्यांनी लस घेतली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट ,आंदोलन करु नका, अशी केली मागणी