महाराष्ट्रात नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून ती एक लाखांपर्यंत खाली आहे.महाराष्ट्रात सध्या एक लाख 01 हजार 337 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात शुक्रवारी 7 हजार 761 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 61 लाख 97 हजार 018 एवढी झाली आहे. त्यापैकी 59 लाख 65 हजार 644 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आज 13 हजार 452 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
महाराष्ट्रात 167 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 26 हजार 727 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.04 टक्के एवढा झाला आहे.राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.27 टक्के एवढा झाला आहे.
राज्यात आतापर्यंत 4 कोटी 50 लाख 39 हजार 617 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 85 हजार 967 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 576 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.महाराष्ट्रात आजवर तब्बल साडेचार कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.तसेच दररोज होणा-या चाचण्यांच्या तुलनेत आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असून, बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक आहे.त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून ती एक लाखांपर्यंत खाली आली आहे.