पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणाही केली. पुढे ते म्हणाले तुम्हा सर्वांच्या त्यागामुळेच भारत आतापर्यंत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात यशस्वी झाला. त्यामुळेच कोरोनाविरोधात भारताची कोरोनाशी लढाई मजबूत आहे.
लॉकडाऊनबाबत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील अधिकारी आणि नेत्यांसोबत बैठका घेण्यात आल्या होत्या. तसेच अनेक नागरिकांनीही भारतातील लॉकडाऊन वाढवण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आता देशातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देश 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात येत
भारताने जर वेळीच कठोर निर्णय घेतले नसते तर आज भारताची परिस्थिती काय असती, याची कल्पनाही करवत नाही. सोशल डिस्टंन्सिंग आणि लॉकडाऊनचा फार मोठा फायदा देशाला झाला आहे. आर्थिकरित्या पाहिलं तर देशाला मोठी किमत चुकवावी लागली आहे. पण भारतीयांच्या तुलनेत ती किंमत काहीच नाही.