Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात या भागात 8 दिवसांसाठी कडक निर्बंध लागू

पुण्यात या भागात 8 दिवसांसाठी कडक निर्बंध लागू
, गुरूवार, 9 जुलै 2020 (10:51 IST)
पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्यामुळे पुणे शहरातील काही भागांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक केले आहेत. हिंजवडी आणि मारुंजी परिसरात आजपासून 8 दिवस कडक निर्बंध लागू केले आहेत. 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान केवळ दूध, मेडिकल आणि दवाखाने सुरू असतील. 
 
पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शहरात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे शहरात बुधवारी 1147 रुग्णांची वाढ झाली आहे, तर संपूर्ण जिल्ह्यात दिवसभरात एकूण 1618 नवीन रूग्णांची वाढ झाली आहे. 
 
पुण्याच्या ग्रामीण भागातही एकाच दिवसात 168 रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32596 वर पोहोचली आहे. 
 
कोरोनाचं हे वाढतं संकट लक्षात घेता पुणे शहरातील काही भागांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक केले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जम्मू काश्मीरमध्ये भाजप नेते वसीम बारी यांची हत्या