Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिलासादायक बातमी : राज्यातील ‘हा’ तालुका झाला कोरोनामुक्त

दिलासादायक बातमी : राज्यातील ‘हा’ तालुका झाला कोरोनामुक्त
मुंबई , सोमवार, 14 डिसेंबर 2020 (10:42 IST)
कोरोनाने जगभरात हैदोस घातला होता. कोरोनाचा आता कुठे प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच औरंगाबादमधून एक दिलासादायक बातमी आहे.

औरंगाबादमधील फुलंब्री हा तालुका करोनामुक्त झाला आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये या तालुक्यात एकही कोरानाचा रूग्ण सापडला नाही. राज्यातील कोरोनामुक्त होण्याचा मान फुलंब्री तालुक्याला मिळाला आहे. याबाबत आरोग्य खात्याने माहिती दिली असल्याचं समजतंय.

जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला होता तेव्हा  पुणे, मुंबई आणि औरंगाबादमध्ये कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या ठिकाणी अनेकदा लॉकडाऊन करण्यात आलं होतं.

दरम्यान, औरंगाबादमध्ये एकूण 46, 293 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 44, 563 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 1096 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आजपासून 24x7 उपलब्ध असेल बँकेची ही सेवा, आपण कधीही घरी बसल्या बसल्या मोठी रक्कम पाठवू शकता