Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

नव्या ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Registration
, सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (08:17 IST)
राज्यात रविवारी ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १८ लाख २० हजार ५९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४७ हजार ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याचा राज्यातील मृत्यूदर २.५९ टक्के एवढा आहे. तसेच राज्यात गेल्या २४ तासांत ४ हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १६ लाख ८० हजार ९२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३६ टक्के एवढे झाले आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८ लाख ४ हजार ४२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख २० हाजर ५९ (१६.८५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २६ हजार ५५५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६ हजार ८१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या राज्यात ९० हजार ९९७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खासदार संजय राऊत यांची लीलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी