राज्यात मंगळवारी 7 हजार 863 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या वाढल्याने सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. राज्यात सध्या 79 हजार 093 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 20 लाख 36 हजार 790 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 6 हजार 332 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.89 टक्के झाले आहे.
राज्यात 7863 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 6332 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2036790 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 79093 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.89% झाले आहे.
दरम्यान, पुण्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. पुण्यात 6 हजार 124 चाचण्या झाल्या त्यात 688 नवीन रुग्णांची वाढ झाली तर, 498 रुग्ण बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सहा रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात सध्या 5 हजार 091 रुग्ण उपचाराधिन घेत आहेत.