रिलायन्सकडून कर्मचाऱ्यांना दिलासा, 'यांना' मिळाणार दुप्पट वेतन

गुरूवार, 26 मार्च 2020 (09:57 IST)

रिलायन्सने कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांवर कोणताही आर्थिक ताण येऊ नये म्हणून रिलायन्सने मासिक वेतन 30 हजार रुपयांहून कमी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुढील काळात दुप्पट वेतन देण्याची घोषणा केली आहे. रिलायन्सने म्हटलं आहे, “मासिक वेतन 30 हजार रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना या महिन्यात दुप्पट वेतन दिलं जाईल. यामागे त्यांचे आर्थिक व्यवहार सुरळीत सुरु राहावेत आणि त्यांच्यावरील आर्थिक भार कमी व्हावा असा उद्देश आहे.” 
रिलायन्सने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे, “या अटीतटीच्या काळात भारतातील नागरिकांना एकमेकांपासून अंतर राखत असतानाच आपल्या नातेवाईकांशी, मित्रांशी, सहकाऱ्यांशी जोडून राहणं महत्त्वाचं आहे. आमच्या कंपनीचे बहुतेक सर्व कर्मचारी घरुन काम करत आहेत. याला जीओ नेटवर्कमध्ये महत्त्वाच्या कामावर असणारे कर्मचारी अपवाद आहेत. ते या काळात 40 कोटी जिओ ग्राहकांना सेवा पुरवत आहेत.”

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख गरजूच्या मदतीसाठी 'दाद' चा पुढाकार, दिले ५० लाख