Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय खरंच करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 6 फुटांचं अंतरही धोकादायक

काय खरंच करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 6 फुटांचं अंतरही धोकादायक
, गुरूवार, 28 मे 2020 (11:39 IST)
करोनाच्या विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं असं वारंवार सांगितलं जात असताना आधी तीन फुटांचं अंतर ठेवण्याचे निर्देश होते नंतर हे अंतर किमान सहा फुट असावे असे सांगण्यात आले. पण आता सहा फुटांचं अंतर ठेवल्यानंतरही करोनाची लागण होण्याची भीती आहे. 
 
धक्कादायक बाब म्हणजे खोकल्याने किंवा शिंकल्याने करोनाचे विषाणू जवळपास 20 फुटांपर्यंत जाऊ शकतात असं एका संशोधनात समोर आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, खोकताना किंवा शिंकताना निघणारे थेंब 20 फुटांपर्यंत प्रवास करु शकतात. 
 
संशोधकांना विविध वातावरणात अभ्यास केला. त्यानुसार खोकणे, शिंकणे तसंच श्वास सोडताना निघणाऱ्या थेंबांचा थंड आणि दमट हवामानात तीन पट वेगाने फैलाव होऊ शकतो. संशोधनाप्रमाणे मोठे थेंब गुरुत्वाकर्षणमुळे एखाद्या गोष्टीवर साचून राहतात पण छोटे थेंब वेगाने व्हायरसचा फैलाव करण्यात सक्षम असून अनेक तास हवेत राहतात.
 
यामुळे सध्या सोशल डिस्टन्सिंगमध्ये सहा फुटांचं अंतर सुरक्षित आहे असे समजणे धोकादायक ठरु शकतं. 
 
या प्रकारे घ्या काळजी
गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे. याने विषाणूंची लागण होण्याचा धोका कमी होतो.
सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन विषाणूंची लागण होण्याचा धोका टाळता येऊ शकतो.
वारंवार चेहरा, नाक, तोंड, कान, डोळ्याला हात लावणे टाळा. बाहेर असताना अधिक काळजी घ्या. 
बाहेर असताना कोणत्याही सतह, दाराचे हँडल, किंवा इतर कोणत्याही वस्तूला अनावश्यक हात लावण्याची सवय सोडा.
थोड्या-थोड्या वेळानंतर हात साबणाने किंवा हँड वॉशने स्वच्छ करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

4.75 कोटी Truecaller अॅप यूजर्सला पसर्नल डेटा हुआ लीक, यात आपला नंबर तर नाही...