Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कन्टेन्मेंट झोनमध्ये 10 ते 17 मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी

कन्टेन्मेंट झोनमध्ये 10 ते 17 मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी
पुणे , शनिवार, 9 मे 2020 (09:24 IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुणे प्रशासनाला निर्देश
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10 मे ते 17 मे पर्यंत कन्टेहन्मेंट झोनमध्ये० ‘लॉकडाऊन’ची (टाळेबंदी) कडक अंमलबजावणी करण्याडच्या सूचना उपमुख्यखमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्याह. कोरोनाचा संसर्ग रोखण्या साठी आरोग्यु, वैद्यकीय शिक्षण आणि पोलीस विभागाला निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वानहीही त्यांनी दिली.

पुणे जिल्ह्या तील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उपमुख्यीमंत्री श्री.पवार यांनी विधानभवनातील (कौन्सिल हॉल) झुंबर हॉलमध्ये् बैठक घेतली. त्या‍वेळी ते बोलत होते. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक आरोग्यक विभागाच्या, संचालक डॉ.अर्चना पाटील, ससूनचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे यांच्या्सह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
उपमुख्य मंत्री श्री.पवार म्हंणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई पाठोपाठ पुणे हे महत्वाचे शहर आहे. येथील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण चिंता वाढविणारे आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याबसाठी सध्या कार्यरत असलेले अधिकारी सक्षम असले तरी त्यां च्यार मदतीसाठी इतरही अनुभवी अधिकारी दिले आहेत. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हाम प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्य  विभाग या सर्वांनी समन्वधय राखून आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. कोरोनाचा संसर्ग रोखण्यागबरोबरच खरीप हंगामाचीही जबाबदारी जिल्हा, प्रशासनावर येणार आहे. यामध्येब योग्ये तो समन्वाय राखून नियोजनबद्ध काम करण्याबच्याह सूचना त्यांनी दिल्याह. कोरोना रोखण्यावच्याव कामाला गती यावी यासाठी महसूल विभागातील वरिष्ठे अधिकारी डॉ.नितीन करीर आणि महेश पाठक यांचीही नेमणूक करण्यारत आल्याचे त्यांनी सांगितले.
 
परराज्यातील जे मजूर आपापल्या राज्यात जाऊ इच्छित असतील त्यांठना रेल्वेकने पाठविण्याआचे नियोजन करण्यादत यावे, असे सांगून उपमुख्यवमंत्री पवार यांनी या मजुरांच्या प्रवासाचा खर्च राज्यॉ शासन किंवा सीएसआर फंडातून (सामाजिक उत्तवरदायित्वय निधी) करण्यागत येईल, असे सांगितले. शहरातील ज्याय भागात कोरोना बाधित रुग्णा अधिक आहेत, तेथून कोणालाही बाहेर जाऊ देण्यावत येवू नये, असे स्पमष्टस निर्देश उपमुख्येमंत्री पवार यांनी दिले. राज्या राखीव पोलीस दलाची मदत घ्या,वयाची असेल तर तीही मदत उपलब्‍ध करुन दिली जाईल, असेही त्यांटनी सांगितले.
 
महापौर मुरलीधर मोहोळ म्हपणाले, पुणे महापालिकेच्यारवतीने 70 हजार कुटुंबाना शिधा देण्यादचे नियोजन करण्या त आले आहे. तसेच मास्कं, सॅनिटायझर्सचे वाटप करण्यावत येत आहे. याशिवाय नियमित आरोग्य तपासणी उपक्रमही राबविण्याटत येत आहे.
 
विभागीय आयुक्तव डॉ.दीपक म्हैहसेकर यांनी पुणे विभागात 837 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 885 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 891 असल्याची माहिती दिली. विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचसाठी सोलापूर जिल्ह्या चा दौरा करुन संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. सातारा जिल्ह्या तील कराड येथे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यारने उद्या सातारा जिल्ह्यामच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे त्यांचनी सांगितले.
 
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व अधिकारी परस्पबर समन्वायाने काम करत असून लवकरच कोरोना संसर्ग रोखण्यायत यश येईल, अशी आशा व्यचक्तक केली. दुकाने उघडणे, नागरिकांना पेट्रोल-डिझेल उपलब्ध होणे याबाबत स्वचयंस्पलष्टय सूचना देण्या त आल्या चेही त्यां नी सांगितले. परराज्या‍त तसेच पुणे जिल्ह्या च्यान बाहेर दुसऱ्या जिल्ह्या त जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांच्याह सोयीसाठी आवश्ययक ते उपाय योजल्याचेही त्यां नी सांगितले.
 
पुणे महापालिका आयुक्तस शेखर गायकवाड यांनी कंटेंन्मेंट भागात महानगरपालिकेच्यावतीने घेण्यात येत असलेल्या खबरदारीची माहिती दिली. कोरोनाचे रुग्ण जास्त आढळून आलेल्याट वस्तीजवळ 5 स्वॅ‍ब सेंटर सुरु करण्यात आले. याशिवाय 6 मोबाईल स्वॅजब युनिटही सुरु करण्यात आले आहेत. सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वलच्छसता करण्यात येत आहे. आरोग्य सेवेवरील ताण कमी करण्यासाठी 200 डॉक्टोरांच्या भरतीची प्रक्रिया उद्यापर्यंत पूर्ण होईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.
 
पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्ति श्रावण हर्डीकर यांनी जीवनावश्य क व बिगर जीवनावश्य क वस्तूंची दुकाने शासनाच्याश निर्देशानुसार सुरु केल्याचे सांगितले. कोरोनाचा संसर्ग रोखण्या्साठी महापालिकेच्या वतीने आवश्याक त्यास सर्व उपायांची काटेकोर अंमलबजावणी करण्या त येईल, असेही त्यांनी स्पमष्ट  केले.
 
पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई व जिल्हाच पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक आरोग्यं विभागाच्याक संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे अधिष्ठाखता डॉ.मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे यांनीही त्यांच्यावर सोपविण्याडत आलेल्या जबाबदारीबाबत तसेच करण्याचत आलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

३४७० रुग्ण बरे होऊन घरी राज्यात कोरोनाचे ३०९४ रुग्ण बरे होऊन घरी