Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

350 किलोमीटर पायपीट केल्यानंतर मजुराची आत्महत्या

350 किलोमीटर पायपीट केल्यानंतर मजुराची आत्महत्या
, शनिवार, 2 मे 2020 (13:53 IST)
लॉकडाऊनमुळे चालत घराच्या दिशेने निघालेल्या मजुराने 350 किलोमीटर अंतर कापल्यानंतर रस्त्यातच आत्महत्या केल्याची घटना घडली. 
 
मूळचे गोंदियाचे असलेले 40 वर्षीय अमरसिंह मडावी हे हैदराबादमध्ये बांधकामाच्या ठिकाणी काम करत होते. पण लॉकडाऊनमुळे त्यांचं काम बंद पडलं. चार दिवस वाट पाहिल्यानंतरही वाहन उपलब्ध न झाल्याने ते आणि त्यांच्या सहकाऱ्याने गोंदियाला पायी जाण्याचा निर्णय घेतला.
 
सुमारे 350 किलोमीटर अंतर कापून वर्ध्यातील गिरडपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना एक ट्रक मिळाली. पण अमरसिंह लघुशंकेला गेले असताना ट्रक त्यांना सोडून गेला. जागा अनोळखी असल्याने आणि एकटेच असल्यामुळे त्यांनी शेतात गळफास घेतल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
 
उपासमार, बेकारी, निराशा यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्याला गिरडचे ठाणेदार महेंद्र सूर्यवंशी यांनीही दुजोरा दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात दारुचा मर्यादित साठा, गोव्यात स्टॉक संपण्याची भीती