Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शासन देणार आता मद्य खरेदी साठी इ टोकन पुण्यात सुरुवात, मुंबईत लवकरच

शासन देणार आता  मद्य खरेदी साठी इ टोकन पुण्यात सुरुवात, मुंबईत लवकरच
, मंगळवार, 12 मे 2020 (09:16 IST)
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वाईन शॉप मध्ये होणा-या गर्दी होऊच नये म्हणून आता स्वतः एक निर्णय घेतला आहे. कोव्हिड -19 या अर्थात करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आता इ टोकन सुविधा उलब्ध केली आहे. ही सुविधा http://www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. हा निर्णय सध्या पुण्यातपुरता झाल्याचे समजते आहे. मुंबईबाबतचा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे.
 
यानुसार ज्या ग्राहकांना मद्य खरेदी करायचे आहे अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून इ – टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे. सुरुवातीला ग्राहकाने आपला मोबाईल नंबर व नाव नमूद करायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा व पिन कोड नमूद करायचा आहे आणि सबमिट बटणवर क्लिक करायचे आहे.
 
असे करा रजिस्ट्रेशन
 
त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणा-या मद्य विक्री दुकानांची यादी दिसेल. सदर पैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल. आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर ग्राहकास इ – टोकन मिळेल. सदर टोकन आधारे ग्राहक आपल्या सोयीच्या वेळी सबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात.
 
मद्य विक्रीची सूट जेव्हा देण्यात आली आणि मद्य विक्रीची दुकानं जेव्हा महाराष्ट्रात उघडली तेव्हा अनेक ठिकाणी मोठी गर्दी झालेली पाहण्यास मिळाली. त्यामुळेच मुंबई आणि ठाण्यातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने तसंच वाईन शॉपही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता अशीच गर्दी होऊ नये यासाठी इ टोकनचा पर्याय दिला आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला देशातल्या मुख्यमंत्र्यांशी संवाद