Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात सर्वाधिक 30,535 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

राज्यात सर्वाधिक 30,535 नव्या कोरोना रुग्णांची वाढ
, सोमवार, 22 मार्च 2021 (07:43 IST)
राज्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या वेगाने पसरत आहे. रविवारी झालेली कोरोना रुग्णांची वाढ ही आतावरची सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. राज्यात 30 हजार 535 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. पुणे, नागपूर, मुंबई या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची वाढ झाली आहे.  
 
आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 24 लाख 79 हजार 682 एवढी झाली आहे. त्यापैकी 22 लाख 14 हजार 867 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 11 हजार 314 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट कमी झाला असून तो 89.32 टक्के एवढा झाला आहे.
 
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढली असून, सध्या राज्यात राज्यात 2 लाख 10 हजार 120 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात  99 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यत 53 हजार 399 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.15 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 9 लाख 69 हजार 867 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 9 हजार 601 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
 
राज्यासाठी दुसरी लाट जास्त धोकादायक ठरत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट आणखी खाली आलाय तर मृत्यूदरही वाढत चालला आहे. मोठ्या शहरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. मुंबईत 3 हजार 779, पुण्यात 2 हजार 978 तर, नागपूर मध्ये 2 हजार 747 नव्या रुग्णांची वाढ झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माझी स्वाक्षरी असलेल्या पत्राची प्रत मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवेन- परमबीर सिंग