राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ४४ हजारांच्या पुढे

शनिवार, 23 मे 2020 (09:19 IST)
महाराष्ट्रात २९४० नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या आता ४४ हजार ५८२ झाली आहे. आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन महाराष्ट्रात १५१७ झाली आहे.गेल्या २४ तासांमध्ये ८५७ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात १२ हजार ५८३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख अमित ठाकरे आरोग्यमंत्र्यांच्या भेटीला, केल्या काही सूचना