राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात बुधवारी कोरोनाच्या 3 हजार 187 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 253 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत 63 लाख 68 हजार 530 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.26 टक्के इतके झाले आहे.
राज्यात 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 011 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9 हजार 280 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या आत आहे. राज्यात नवीन रुग्णांचे प्रमाम कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे.
राज्यात सध्या 36 हजार 675 सक्रिय (Active patient) रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 2 लाख 52 हजार 309 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
तर 1 हजार 453 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपसण्यात आलेल्या 5 कोटी 85 लाख 84 हजार 819 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी
65 लाख 47 हजार 793 (11.18 %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.