Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.९९ टक्के

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.९९ टक्के
, बुधवार, 17 जून 2020 (10:00 IST)
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.९९ टक्के एवढा झाला आहे. राज्यात मंगळवारी  १८०२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ५७ हजार ८५१ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७०१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५० हजार ४४ रुग्णांवर (ॲक्टिव) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 
राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. पाठविण्यात आलेल्या ६ लाख ८४ हजार २६८  नमुन्यांपैकी  १ लाख १३ हजार  ४४५  नमुने पॉझिटिव्ह (१६.५७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख  ८६ हजार  ८६८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ८० हजार ५०२ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार २४२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
आज राज्यात ८१ मृत्यू झाले आहेत. याशिवाय आज मुंबईतील ८६२ आणि उर्वरित राज्यातील ४६६ अशा एकूण १३२८ जुन्या मृत्यूंची नोंद घेण्यात येत आहे. त्यात जिल्हानिहाय आकडेवारी अशी: अहमदनगर १, अकोला १४, अमरावती ६, औरंगाबाद ३३, बुलढाणा २, धुळे १२, जळगाव ३४, जालना ४, लातूर ३, नांदेड २, नाशिक २८, उस्मानाबाद ३, पालघर ११, परभणी १, पुणे ८५, रायगड ११, रत्नागिरी १, सांगली ४, सातारा ६, सिंधुदूर्ग ३, सोलापूर ५१, ठाणे १४६, वाशिम १, यवतमाळ १ अशी एकूण ४६६. राज्याचा मृत्यूदर ४.८ झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिलासादायक! मुंबईत आता २८ दिवसांनी कोरोनाबाधित दुप्पट