Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात ६०,१४७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु

राज्यात ६०,१४७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु
, सोमवार, 22 जून 2020 (10:04 IST)
राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला अनेकजण कोरोनातून बरे होत आहेत. २१ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील ६५,७४४ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सध्या राज्यात ६०,१४७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
 
पाठविण्यात आलेल्या ७ लाख ७३ हजार ८६५ नमुन्यांपैकी १ लाख ३२ हजार ७५ नमुने पॉझिटिव्ह (१७.६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ६६ हजार  ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार २८७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी ६९ मृत्यू हे वर नमूद केल्याप्रमाणे मागील कालावधीतील आहेत. उर्वरित १०१ मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-७० (मुंबई ४१, ठाणे मनपा २९), नाशिक-८ (नाशिक ७, अहमदनगर १), पुणे-१४ (पुणे १४), औरंगाबाद-१ (औरंगाबाद १), लातूर-१ (लातूर १), अकोला-७ (अकोला ४, अणरावती १, बुलढाणा १, वाशिम १). कोरोनामुळे मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६१७० झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दानशूर, नव्याने उभारलेली १९ माळ्यांची इमारत दिली क्वारंटाइन सेंटरसाठी