Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमेरिकेमधून एक सकारात्मक बातमी कोरोना रेमडेसिवीर (Remdesivir) हे औषध करोनावर परिणामकारक ठरत असल्याचा दावा

अमेरिकेमधून एक सकारात्मक बातमी कोरोना रेमडेसिवीर (Remdesivir) हे औषध करोनावर परिणामकारक ठरत असल्याचा दावा
, गुरूवार, 30 एप्रिल 2020 (22:16 IST)
करोना विषाणूवर परिणामकारक ठरणाऱ्या लसीचा शोध घेण्याचा प्रयत्न जगभरातील ८० वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सुरु आहे. असतानाआता  अमेरिकेमधून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. संशोधकांनी रेमडेसिवीर (Remdesivir) हे औषध करोनावर परिणामकारक ठरत असल्याचा दावा केला आहे. करोनावर मात करणारे औषध सापडल्याचा दावा करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार असणाऱ्या डॉक्टर अँथोनी फॉउसी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. रेमडेसिवीर औषधांचा वापर करण्यात आलेल्या करोनाग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीमध्ये चांगली  सुधारणा झाल्याचे अढळून आलं आहे, असं फॉउसी यांनी स्पष्ट केलं आहे. रेमडेसिवीर देण्यात आलेल्या रुग्णांनी करोनावर ३० टक्के वेगाने मात केल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ अलर्जी अण्ड इफेक्शियस डिसीजने (एनआयएआयडी) रेमडेसिवीर औषध दिलेले रुग्ण हे इतर औषध देण्यात आलेल्या रुग्णांच्या तुलनेत अधिक वेगाने करोनावर मात करु शकले असं म्हटलं आहे. रेमडेसिवीर देण्यात आलेले रुग्ण ११ दिवसांमध्ये तर इतर औषधांवर असणारे रुग्ण १५ दिवसांमध्ये करोनामधून बरे झाल्याचे निरिक्षक नोंदवले आहे. “पूर्ण १०० टक्के परिणाम दिसून आला नसला तरी हे यशच आहे. कारण या प्रयोगांमधून औषधांमुळे या विषाणूचा प्रसार थांबवता येईल हे सिद्ध झालं आहे,” असं मत फॉउसी यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
 
२१ फेब्रुवारीपासून अमेरिका, युरोप आणि आशियातील एकूण ६८ ठिकाणी या औषधाची चाचणी एक हजार ६३ रुग्णांवर सुरु होती. अनेक दिवसांच्या चाचणीनंतर हे औषध इतर औषधांच्या तुलनेत करोनावर अधिक प्रभावी असल्याचे समोर आलं आहे. यासंदर्भात बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही ‘सकारात्मक बातमी’ आहे असं म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऋषी कपूर यांच्या यांच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट