Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

औरंगाबादेत लसीकरण पुर्णपणे बंद

औरंगाबादेत लसीकरण पुर्णपणे बंद
, बुधवार, 21 जुलै 2021 (15:34 IST)
औरंगाबाद शहरात कोरोना रुग्ण कमी आहे ही समाधानाची बाब असली तरी गेल्या  महिनाभर औरंगाबादेत लसींचा प्रचंड तुडवडा आहे, गरजेपेक्षा खूप कमी लस येताय, आणि त्या अवघ्या काही तासांतच संपत असल्यानं नागरिकही मेटकूटीला आले आहेत. गेली 4 दिवस तर औरंगाबादेत लसीकरण पुर्णपणे बंद आहे. महापालिकेनं राज्यशासनाला लसींबाबत माहिती दिली मागणीही नोंदवली मात्र शासनाकडून सुद्धा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे.          
 
यामुळे महापालिकेचे शहरातील 100 पेक्षा जास्त लसीकरण केंद्र बंद आहेत. नागरिक चौकशी करून जाताय, मात्र समाधानकारक उत्तर कुणाचजवळ नाही..  नागरिकांच्या आणि महापालिकेच्या प्रयत्नांनी रुग्णंसख्येवर नियंत्रण मिळवलं, मात्र लसींचा असाच तुटवडा राहिला तर खरंच येणा-या तिस-या लाटेपासून औरंगाबादकरांचा बचाव होवू शकेल का हा सध्या भेडसावणारा प्रश्न आहे..
 
महापालिकेनं आतापर्यंत 3,84,959 लाख लोकांना पहिला डोस दिला आहे, तर 1,42,33 लाख लोकांना दुसरा डोस मिळाला आहे, तर सध्या 76 हजार नागरिकांचा दुसरा डोस देय आहे,मात्र लसींचा तुटवड्यामुळं त्यांना प्रतिक्षा करण्याशिवाय पर्याय नाहीये. दुसरीकडे औरंगाबादेत खाजगी हॉस्पिटलमध्ये लसींचा पुरेसा साठा आहे, माहितीनुसार सध्या शहरातील खाजगी हॉस्पिटलकडे 38 हजार लसींचा साठा आहे.आणि महापालिकेच्या मोफत केंद्रावर लस  नाही, यातून आता फक्त पैसै देवूनच लसीकरण होत आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मग फक्त कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल का केले ?