संयुक्त राष्ट्र / जिनिव्हा जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) चे प्रमुख टेड्रोस अदहानम गेब्रेयेसस यांनी असा इशारा दिला की कोविड 19 हा डेल्टा प्रकार किमान 85 देशांमध्ये सापडला आहे.आतापर्यंत सापडलेल्या सर्व प्रकारांपैकी हा 'अत्यंत संक्रामक' आहे आणि तो त्या लोकांमध्ये झपाट्याने पसरत आहे.ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही.
डब्ल्यूएचओ महासंचालकांनी पत्रकार परिषदेत सांगितले की मला माहित आहे की सध्या जगभरातील डेल्टा प्रकाराबद्दल खूप काळजी आहे आणि डब्ल्यूएचओ देखील त्याबद्दल चिंताग्रस्त आहे.
ते जिनेव्हा येथे म्हणाले की डेल्टा ही आतापर्यंत सापडलेल्या सर्व प्रकारांपैकी सर्वात संसर्गजन्य आहे आणि त्याची ओळख किमान 85 देशांमध्ये झाली आहे आणि ज्यांना अद्याप लस दिली गेली नाही त्यांच्या मध्ये हा झपाट्याने पसरत आहे.
काही देशांमध्ये सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाययोजना शिथिल केल्याबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, जगभरातील संक्रमणामध्ये वाढ दिसून येत आहे.अधिक प्रकरणांचा अर्थ आहे अधिक संख्येत रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे,या मुळे आरोग्य सेवा कर्मचारींवर आणि आरोग्य यंत्रणेवर अधिक दबाव वाढेल आणि मृत्यू होण्याचा धोका वाढेल.
गेब्रेयेसस म्हणाले,की कोविड-19 चे नवीन स्वरूप येण्याची शक्यता आहे आणि हे येत राहतील.ते म्हणाले "व्हायरस असेच करतात,ते सतत जन्म घेतात परंतु आपण या संसर्गाच्या प्रसाराला थांबवून त्याच्या स्वरूपाची वाढ रोखू शकतो.
डब्ल्यूएचओच्या कोविड -19 च्या तांत्रिक लीड डॉ. मारिया वान कर्खोव यांनी सांगितले की डेल्टा हे स्वरूप एक धोकादायक विषाणू आहे.आणि अल्फाच्या स्वरूपापेक्षा अधिक संक्रामक आहे.जे युरोप आणि इतर देशांमध्ये स्वतःच अत्यंत संसर्गजन्य होता.
त्या म्हणाल्या,की बर्याच युरोपियन देशांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे, परंतु मोठ्या प्रमाणात खेळ किंवा धार्मिक कार्यक्रमांसह इतर कार्यक्रमही होत आहेत. ते म्हणाले की या सर्व उपक्रमांचा एक परिणाम आहे हा डेल्टा व्हायरस आणि अद्याप ज्यांनी ही लस घेतलेली नाही त्यांच्या मध्ये हा संसर्ग वेगाने वाढत आहे.
कर्खोव म्हणाल्या की काही देशात लस घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे.परंतु तरीही त्या देशातील संपूर्ण लोकसंख्येला लस दिली गेली नाही.आणि काही लोकांनी अँटी कोविड-19 चा दुसरा डोस अद्याप घेतलेला नाही.
त्या म्हणाल्या,की अँटी कोविड-19 लस आजार आणि मृत्यू पासून बचाव करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले की हे समजणे सोपे आहे की अधिक संसर्ग पसरणे म्हणजे त्या विषाणूचे जास्त स्वरूप येणे आणि संसर्ग कमी पसरणे म्हणजे की त्या व्हायरसचे स्वरूप कमी आहे. ते म्हणाले की डब्ल्यू एच ओ हे वर्षभरापासून सांगत आहे की लसांचे वाटप समानरित्या झाले पाहिजे.