Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

म्हणून पोलिसांनी टक्कल करण्याचा घेतला निर्णय

म्हणून पोलिसांनी टक्कल करण्याचा घेतला निर्णय
, सोमवार, 6 एप्रिल 2020 (17:49 IST)
कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी फतेहपूर सीकरी पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. रविवारी या पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकासह ७५ पोलिसांनी सामुहिक टक्कल केलं आहे. टक्कल केल्यानंतर हे पोलीस जेव्हा बंदोबस्तासाठी बाहेर पडले तेव्हा लॉकडाऊन असूनही नागरिक घराच्या दरवाज्यात, खिडकीत उभं राहून त्यांना बघू लागले.  
 
पोलीस ठाण्याचे निरीक्षक भूपेंद्र सिंह बालियान यांनी दिलेल्या माहितीनुसार,'नागरिक तोंडाला मास्क लावण्याबरोबरच डोक्याला देखील रूमाल बांधत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा विषाणू डोक्याच्या केसातही अडकून राहू शकतो. तेथून श्वासाच्या माध्यातमातून तो आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. यामुळेच पोलिसांनी टक्कल करण्याचा निर्णय घेतला. टक्कल करणाऱ्यांमध्ये पोलीस निरीक्षकांसोबतच निरीक्षक अमित कुमार, नऊ उपनिरीक्षक आणि इतर पोलिसांचा समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले