Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंढरपूर पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतो काय?

पंढरपूर पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतो काय?
, सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (23:42 IST)
आषाढी वारी झाल्यानंतर आता पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. शहरात आणि तालुक्यातील गावोगावी रॅपिड आणि RTPCR चाचणीचे कॅम्प भरवले जाणार असल्याची माहिती पंढरपूर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पुढाकार घेतलाय. 
 
पंढरपूर शहर आणि तालुक्यात सोमवारी  जवळपास 3 हजार 600 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात 128 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पंढरपूरमध्ये कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. पंढरपूरमध्ये रविवारी 152 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंत  प्रशासनानं शहर आणि ग्रामीण भागात कोरोना चाचण्या घेतल्या. त्यात तुंगत, कासेगाव, गादेगाव यासह वाखरी आणि अन्य गावांचा समावेश होता.
 
सोमवारी एकूण 3 हजार 527 रॅपिड चाचण्या, तर 54 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांची एकूण संख्या 3 हजार 581 होती. त्यातील 128 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे पंढरपुरातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर 3.57 टक्के असल्याचं प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात आढळून येत आहेत. तालुक्यात आजपर्यंत 28 हजार 729 रूग्ण आढळून आले आहेत. 539 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पंढरपूरमध्ये सध्या 799 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 27 हजार 391 रुग्ण पूर्णपणे बरे होवून घरी परतले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत लशीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी लहान मुलंच मिळत नाही