Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'तर' त्याच्यावर कारवाई होणार : अनिल देशमुख

Anil Deshmukh
, शुक्रवार, 20 मार्च 2020 (07:54 IST)
कोरोना व्हायरसचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, कोरोनाचे जे संशयित आहेत, त्यांना कोरोना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत आहे. मात्र, विलगीकरण केंद्रातून काही जण पळून जात आहेत. याबाबत राज्य शासन आणि पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. आता यापुढे कोणीही पळून गेला किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलिसांनी दिले आहेत. 
 
संशयित कोरोना रुग्णांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत आहे.मात्र, विलगीकरण केंद्रातून रुग्ण पळून जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा रुग्णांवर आता साथीचे रोग अधिनियमान्वये कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानंतर पोलिसांनी या आदेशाचे पालन करती असे कोणी पळून गेले तर त्यांच्यावर त्वरीत कारवाई करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य पोलिसांनी म्हटले आहे.
 
दरम्यान, केंद्रातून पळून जाणाऱ्यांवर "साथीचे रोग अधिनियमान्वये" कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पोलिसांना दिले आहेत. देशमुख यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. राज्यात कोरोना विषाणूंचा होणारा फैलाव रोखण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

२२ मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानाला भारतात लँडिंग नाही