Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 7 October 2025
webdunia

पराभव पचवत क्रिकेटला ‘गुडबाय’

sangakara
सिडनी , गुरूवार, 19 मार्च 2015 (10:56 IST)
सलग चार शतके झळकावून ‘त्याने’ वर्ल्डकपमध्ये दहशत निर्माण केली...त्याने तब्बल ५४१ धावा केल्या...या खेळीमुळे त्याचा त्याचा संघ वर्ल्डकपचा प्रमुख दावेदारही मानला जाऊ लागला... पण, अखेर पराभव पचवत ‘त्याला’ क्रिकेटला निरोप द्यावा लागला...वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्नही भंगले...त्याचे नाव...कुमार संगकारा...
वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला. माहेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले़ पराभवाने त्यांच्या वन-डे कारकिदीर्चा अखेर झाला़  या स्पधेर्पूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती़

संगकाराने ४ शतके झळकावून वर्ल्डकपमध्ये दबदबा निर्माण केला होता. मात्र, आफ्रिकेविरुद्ध त्याचा संघ १३३ धावांत तंबूत परतला़  त्याने ४५ धावा केल्या. माहेला जयवर्धनेने क्रिकेटचा ‘रामराम’ घेतला. पराभवाचे दु:ख पचवत श्रीलंका क्रिकेटमध्ये मला जे स्थान आहे, त्याचा अभिमान आहे, अशी भावना त्याने व्यक्त केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi