भारत गतविजेता आहे. तसेच त्यांच्यात सर्वोत्कृष्ट खेळ करण्याची क्षमता आहे. त्यामुळे धोनी आणि सहकार्यांना कमी लेखू नका. त्यासोबत त्यांच्याविरुद्ध लिहू नका, असा इशारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने आपले संघसहकारी तसेच ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांना दिला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक जागतिक स्पर्धा जिंकल्या आहेत. कर्णधार, फलंदाज आणि यष्टिरक्षक म्हणून तो सर्वोत्कृष्ट आहे. शिवाय रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य राहणे सारखे चांगले फलंदाज भारताकडे आहेत. ऑस्ट्रेलियात कामगिरी खालावली तरी भारताला जेतेपद राखता येण्यात अडचणी येतील, असे म्हणणे योग्य नाही, असे क्लार्कने सांगितले.