विश्वचषक स्पर्धेआधीच टीम इंडियाच्या गोलंदाजी बुरुजाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा विश्वचषक स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. नुकत्याच इंग्लंडविरोधात झालेल्या एकदिवसीय सामन्यात इशांतच्या जागी मोहित शर्माचा संघात समावेश करण्यात आला होता तर, तिरंगी मालिकेसाठी निवड करण्यात आलेल्या धवल कुलकर्णीला माघारी न बोलावता विश्वचषकासाठी राखीव गोलंदाज म्हणून त्याचा विचार केलाजात आहे.