वर्ल्ड कप 2015चा पहिला क्वार्टर फायनल सामना श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेत बुधवारी सिडनी येथे खेळला जाणार आहे. क्रिकेट विशेषज्ञ या सामन्यासाठी कुठल्याही संघाला फेवरेट मानत नाही आहे. अर्थात हे सांगणे फारच अवघड आहे की उंट कोणत्या बाजूला बसेल.
2007चा कारनाम्याची पुनरावृत्ती करेल का मलिंगा?
दक्षिण आफ्रिका संघ टीम फार मजबूत आहे. एबी डिविलियर्सच्या संघाला वर्ल्ड कपाच्या सुरुवातीतच किताबाचा दावेदार मानण्यात येत होते, पण ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तानने केलेल्या पराभवामुळे संघाचे आत्मविश्वास थोडे डगमगवले आहेत. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पराभवानंतर डिविलियर्स नेल म्हणाला होता की मी एकटा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आलेलो नही आहे. त्यानंतर देखील हा संघ किताब जिंकण्याचा दम ठेवतो आणि जर त्यांनी क्वार्टर फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव केला तर कोणालाही आश्चर्य वाटणार नाही.
मुरलीने दिला सल्ला, डीविलियर्सला घाबरू नका
दुसरीकडे श्रीलंका संघ आहे, ज्यात अनुभवी खेळाडूंची संपूर्ण फौज आहे. कुमार संगकारा, महेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान, लसिथ मलिंगा सारखे खेळाडू कदाचित : आपला शेवटचा वर्ल्ड कप खेळत आहे आणि ते हा वर्ल्ड कप जिंकण्याचा पूर्ण प्रयत्नात आहे.
संगकारा आणि दिलशान आपल्या जीवनाच्या सर्वश्रेष्ठ फॉर्मात आहे आणि त्यांनी या वर्ल्ड कपामध्ये बरेच रेकॉर्ड कायम केले आहे. संगकारा आतापर्यंत या वर्ल्ड कपात सर्वात धावा काढणारा फलंदाज बनला आहे आणि दक्षिण आफ्रिकेला त्यापासून सावध राहणे फारच गरजेचे आहे.
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका दोन्ही देश फॉर्मात आहे आणि अंदाजा लावणे फारच मुश्कील आहे की कुठला संघ जिंकेल. हा सामना सिडनीत होणार आहे आणि येथे स्पिन गोलंदाज जास्त प्रभावी असल्यामुळे धावांवर अंकुश लावू शकतात. श्रीलंका या विभागात दक्षिण आफ्रिकेपेक्षा पुढे आहे. रंगना हैरथ भले दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळू शकला नाही, पण सेनानायके आणि सीकुजे प्रसन्नाची जोडी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना संकटात आणू शकतात. मधल्या ओवर्समध्ये दिलशान देखील उत्तम गोलंदाजी करत आहे.
वर्ल्ड कप 1992चा इतिहासाची पुनरावृत्ती होईल का?
दक्षिण आफ्रिकेसाठी स्पिन गोलंदाजीची जबाबदारी इमरान ताहिरच्या कांद्यावर राहणार आहे. ताहिरने आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले आहे, पण श्रीलंकेचे दिग्गज फलंदाज स्पिन खेळण्यात उस्ताद आहे, म्हणून असे ही होऊ शकते की ताहिरच्या स्पिनचा जादू चालणार नाही.
वर्ल्ड कपात काट्याची टक्कर, भारत तयार
एकूण वर्ल्ड कपाचा पहिला क्वार्टर फायनल श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेत असल्यामुळे आम्हाला उत्तम क्रिकेट बघायला मिळणार आहे, ज्यात श्रीलंकाचे शीर्ष क्रम आणि दक्षिण आफ्रिकाचे मध्यक्रमाचे फलंदाजांमध्ये जोरदार लढाई होण्याची शक्यता आहे.