साउदॅम्प्टन- आयसीसी वर्ल्ड कप 2019 मध्ये आज भारताचा सामना दोनदा विश्व चँपियन दक्षिण आफ्रिकाविरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार तीन वाजता सामना सुरु होणार.
भारतीय संघाची तयारी जोरदार असली तरी पहिल्या सामन्याची कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. पण आजचे अकरा शिलेदार कोण यावर सर्वांची नजर टिकून आहे. खेळपट्टीचा अंदाज बांधता आफ्रिकेविरुद्ध भारत एक अतिरिक्त जलदगती गोलंदाजासह मैदानात उतरेल, असे संकेत कोहलीनं दिले.
पराजयाचा सामना करत असलेला दक्षिण आफ्रीका जखमी वाघाप्रमाणे भारताला सामोरा जाणार आहे. आयपीएलमध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे 35 वर्षीय वेगवान गोलंदाज डेल स्टेन फिटनेस समस्यामुळे वर्ल्डकपमधून बाहेर आहे. स्टनेऐवजी ब्यूरोन हेंडरिक्सला संघात सामील करण्यात आले आहे.
विराट गोलंदाजांच्या दृष्टीनं विचार करत दोन फिरकीटू व दोन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरल्यास सुरुवातीला परिस्थिती वेगळी आणि नंतर वेगळी असेल असा अंदाज बांधत आहे. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी गोलंदाजांनी तयारी करायला हवी.
ऑलराउंडर केदार जाधव फिट घोषित केले गेले आहे त्यामुळे त्याचे संघात असणे फायद्याचे ठरेल. या खेळपट्टीवर घास नसल्याने फलंदाजांसाठी आपलं कमाल दाखवण्याची संधी आहे. भारतीय संघाकडे अनेक मॅच विनर आहे त्यामुळे आत्मविश्वास भरपूर आहे.