वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं पाकिस्तानच्या संघाला 89 धावांनी पराभूत करत वर्ल्ड कपमधला इतिहास कायम ठेवला. मात्र पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक लोकांच्या डोळ्यात आले. शोएब जिरोवर बाद झाला आणि हा सामना गमावल्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्याच्या आदल्या रात्री पाकिस्तानाची संघ एका नाइट पार्टीत मशगुल असल्याचं एका व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
तसं तर स्पष्टीकरण देत शोएबने हा व्हिडिओ 13 जूनचा असल्याचे सांगितले. परंतू सानिया परवानगी न घेता व्हिडिओ काढल्यामुळे नाराज आहे. या प्रकरणात पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी सानियावर टीका केल्या आहेत. बिग बॉसची माजी कंटेस्टंट पाक अभिनेत्री वीणा मलिकने देखील यात उडी मारली आहे. नंतर सानिया आणि वीणा मलिक यांच्यात ट्विटर वॉर रंगला.
यात शीशा नाइट क्लबमध्ये पाकिस्तानी खेळाडू आणि त्यांच्या पत्नी दिसत असून काही पाकिस्तानी खेळाडू हुका पितानाही दिसत आहेत. फिटनेसच्या दृष्टीने अशी पार्टी आणि बाहेरचं डिनर खेळाडूंसाठी योग्य नसल्याचे म्हटले जात आहे.
यावर वीणा मणिकने ट्विट करत म्हटले की सानिया मी खरंच तुमच्या मुलांविषयी काळजीत आहे. आपण मुलांसकट शीशा पॅलेसमध्ये आहात, काय हे धोकादायक नाही? आणि ज्या क्लबमध्ये तुम्ही आहात तिथे जंक फुड मिळतं आणि ते खेळाडूंसाठी योग् नाही. तुला ही गोष्ट माहीत नाही जेव्हा की तू स्वत: आई आणि एथलीट देखील आहे.
वीणाच्या या ट्विटनंतर सानिया संतापली आणि तिने प्रत्युत्तर देत म्हटले की वीणा मी आपल्या मुलाला घेऊन शीशा पॅलेस गेले नव्हते आणि या सगळ्यासाठी तुला आणि इतर दुनियेला काळजी नसावी. मी आपल्याला मुलाची योग्य ती काळजी घेते असे मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पाकिस्तानी क्रिकेट संघाची डायटीशियन किंवा आई किंवा शिक्षिका नाही.
यावर वीणाने पुन्हा लिहिले की मुलगा सोबत नाही हे कळल्यावर बरं वाटलं. आणि होय, मी तुला संघाची आई किंवा डायटीशियन म्हटले नाही. मी तर हे म्हटले की तू एथलीट आहे आणि तुला एथलीटच्या फिटनेसचं महत्त्व माहीत असावं. आणि काय तू एका क्रिकेटरची बायको नाही? तुला त्याच्या आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे... त्यात मी काय चुकीचं बोलतेय?
त्यावर पुन्हा सानियाने उत्तर दिलं. पण नंतर तिने ट्विट डिलीट देखील केले. पण काही लोकांनी त्याचं स्कीन शॉट घेतलं होतं. त्यात सानिया म्हणाली होती की आम्हाला माहीत आहे की कधी झोपायचं, कधी उठायचं आणि कधी जेवायचं. आणि सर्वात महत्त्वाचं आणि काळजी सारखं तर हे आहे की आपण पत्रिकांच्या कव्हर पेजसाठी जे काही केलेले आहे ते मुलांसाठी योग्य नाही. काय हे धोकादायक असल्याचं तुला माहीत नाही? तरी आमची काळजी घेण्यासाठी धन्यवाद. सानियाने डिलीट केलेल्या ट्विटचा स्क्रीन शॉट स्वत: वीणा मलिकने देखील शेअर केला आहे.
सानिया मिर्झाने व्हायरल व्हिडिओबद्दल देखील ट्विट करत ट्रोलर्सला म्हटले आहे की व्हिडिओ आम्हाला न सांगता शूट करण्यात आला असून हे आमच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण आहे. सामना हरल्यावर काय आम्ही जेवण सोडून देणार का? येथे मूर्खांची मंडळी आहे, पुढच्या वेळी चांगला प्रयत्न असावा.