Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रिकेट वर्ल्ड कप Pak vs Ned : पाकिस्ताननं विश्वचषकाच्या इतिहासात नोंदवला भारतातील पहिला विजय

क्रिकेट वर्ल्ड कप Pak vs Ned : पाकिस्ताननं विश्वचषकाच्या इतिहासात नोंदवला भारतातील पहिला विजय
, शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (23:48 IST)
पाकिस्ताननं वन-डे विश्वचषकाच्या इतिहासात भारतामधील पहिला विजय नोंदवलाय. हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात त्यांनी नेदरलँड्सचा 81 धावांनी पराभव केला. पाकिस्ताननं दिलेल्या 287 धावांच्या आव्हांनाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संपूर्ण संघ 205 धावावर बाद झाला.
 
नेदरलँड्सकडून विक्रमजीत सिंग आणि बास दी लीडे यांनी अर्धशतक झळकावलं. दी लीडे नं सर्वाधिक 67 धावा केल्या. तर सलामीवीर विक्रमजीतनं 52 धावांची खेळी केली. त्यांना अन्य खेळाडूंची साथ न मिळाल्यानं नेदरलँड्सला धक्कादायक निकाल नोंदवण्यात अपयश आलं.
 
नेदरलँड्सवरील मोठ्या विजयामुळे पाकिस्तानचा नेट रन रेट चांगला झाला असून त्यांना या स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यात फायदा होऊ शकतो. 2019 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचा पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं मोठा पराभव केला होता. या पराभवाचा परिणाम पाकिस्तानच्या नेट रन रेटवर झाला आणि त्यांना सेमी फायनल गाठण्यात अपयश आलं होतं.
 
पाकिस्तानचा पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर, नेदरलँड्सचा 9 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध होईल. या विश्वचषकात प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे. साखळी फेरीत सर्वाधिक गूण मिळवणारे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील.
 
हैदराबादमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्ताननं नेदरलँड्स समोर विजयासाठी 287 धावांचं आव्हान ठेवलंं होतं.
 
पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्ताननं 49 ओव्हर्समध्ये 286 धावा केल्या.
 
पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी अर्धशतक झळकावली. ते दोघंही प्रत्येकी 68 धावा काढून बाद झाले. 3 बाद 38 या नाजूक परिस्थितीतून त्यांनी पाकिस्तानला बाहेर काढलं. रिझवान आणि सौद जोडीनं चौथ्या विकेटसाठी 120 धावांची भागिदारी केली.
 
सौद शकीलनं 32 चेंडूत अर्धशतक झळकावलं. एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानी फलंदाजानं झळकावलेलं हे दुसऱ्या क्रमांकाचं वेगवान अर्धशतक आहे. सौदनंतर मोहम्मद रिझवाननं 58 चेंडून त्याचं अर्धशतक पूर्ण केलं.
 
सौद आणि रिझवान आऊट झाल्यानंतर मोहम्मद नवाझ आणि शादाब खान जोडीनं सातव्या विकेटसाठी 64 धावांची भागिदारी केली. नवाझनं 39 तर शादाबनं 32 धावा केल्या. शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ या शेवटच्या जोडीनं फटकेबाजी करत पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं.
 
नेदरलँड्सकडून बास डी लीडे यानं सर्वात जास्त 4 विकेट्स घेतल्या. कॉलिन एकरमननं 3 विकेट्स घेत उत्तम साथ दिलीय.
 
त्यापूर्वी 2011 नंतर वन-डे विश्वचषकासाठी पहिल्यांदाच पात्र ठरलेल्या नेदरलँड्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानची टीमही सात वर्षांनी पहिल्यांदाच भारतामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळत आहे.
 
मोठी धावसंख्या उभारण्याच्या निर्धारानं मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. फखर झमान 12 धावा काढून बाद झाला. गेल्या काही महिन्यांपासून मोठी धावसंख्या उभारण्यासाठी संघर्ष करणाऱ्या फखरचा खराब फॉर्म विश्वचषकातील पहिल्या सामन्यातही कायम आहे.
 
त्यानंतर कॉलिन एकरमननं पाकिस्तानला मोठा धक्का दिला. त्यानं बाबर आझमला फक्त 5 धावांवर बाद केलं. बाबरकडून मोठ्या खेळीची सर्वांनाच अपेक्षा होती, पण त्याला पहिल्या सामन्यात तरी अपयश आलंय.
 
बाबर आझम बाद झाल्यानंतर पाकिस्तानवरील दडपण पॉल व्हॅन मीकरेननं आणखी वाढवलं. त्यानं इमाम उल हकला 15 धावांवर बाद करत नेदरलँड्सला तिसरं यश मिळवून दिलं. पहिल्या दहा ओव्हर्सच्या पॉवर प्लेमध्ये नेदरलँड्सनं वर्चस्व गाजवलं.
 
पाकिस्तानची खराब सुरुवात
याआधी मोठी धावसंख्या उभारण्याच्या निर्धारानं मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरूवात खराब झाली होती.
 
फखर झमान 12 धावा काढून बाद झाला. गेल्या काही महिन्यांपासून मोठी धावसंख्या उभारण्यासाठी संघर्ष करणाऱ्या फखरचा खराब फॉर्म विश्वचषकातील पहिल्या सामन्यातही कायम आहे.
 
त्यानंतर कॉलिन एकरमॅननं पाकिस्तानला मोठा धक्का दिला. त्यानं बाबर आझमला फक्त 5 धावांवर बाद केलं. बाबरकडून मोठ्या खेळीची सर्वांनाच अपेक्षा होती, पण त्याला पहिल्या सामन्यात तरी अपयश आलंय.
 
बाबर आझम बाद झाल्यानंतर पाकिस्तानवरील दडपण पॉल व्हॅन मीकरेननं आणखी वाढवलं. त्यानं इमाम उल हकला 15 धावांवर बाद करत नेदरलँड्सला तिसरं यश मिळवून दिलं. दहा ओव्हर्सच्या पहिल्या पॉवर प्लेवर नेदरलँड्सनंच वर्चस्व गाजवलं.
 
पण नंतर पाकिस्तानने आपली खेळी सुधारली.
 
वर्ल्डकपचा दुसरा सामना आज (6 ऑक्टोबर) होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात नेदरलँड्सचा कॅप्टन स्कॉट एडवर्ड्सनं टॉस जिंकून पहिल्या गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
वन-डे विश्वचषकात भारतीय भूमीवरील पहिला विजय मिळवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असेल. यापूर्वी भारतात खेळलेल्या या स्पर्धेतील 2 सामन्यात त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं.
 
नेदरलँड्सचा संघ 2011 नंतर पहिल्यांदाच वन-डे विश्वचषक खेळत आहे. या विश्वचषकासाठी झालेल्या पात्रता फेरीत त्यांनी वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांना मागं टाकत अंतिम स्पर्धेसाठी जागा मिळवलीय.
 
असे आहेत दोन्ही संघ
पाकिस्तान : इमाम-उल-हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), सौद शकील, इफ्तिकार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्म वसीम ज्यूनिअर, शाहिन आफ्रिदी, हॅरिस रौफ
 
नेदरलँड्स : विक्रमजीत सिंह, मॅक्स ओ’डॉड, वेस्ले बेरसी, बास दी लीडे, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स, (कर्णधार आणि विकेटकिपर), लोगान वॅन बीक, साकिब झुल्फिकार, रुलाफ व्हॅन डर मर्व, पॉल व्हॅन मीरीकेन, आर्यन दत्त
 
काय आहे दोन्ही संघांची परिस्थिती?
एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची लोकप्रियता कमी होत असताना नेदरलँड्सचा संघ मात्र 2023 च्या वर्ल्डकपसाठी पात्र ठरलाय.
 
पात्रता स्पर्धेत तब्बल सात प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही चांगला खेळ करून हा संघ वर्ल्डकप साठी भारतात आलाय. मात्र दुर्दैवाने पावसामुळे त्यांना एकही सराव सामना खेळता आलेला नाही.
 
कर्नाटकच्या रणजी संघविरुद्ध खेळलेल्या दोन सामान्यांना सोडून अलीकडच्या काळात दर्जेदार क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे नाहीये.
 
कोण काय म्हणालं?
पाकिस्तान संघातील फिरकी गोलंदाजांबाबत बोलताना मिकी आर्थर म्हणाले की, "आमच्या खेळाडूंकडे अप्रतिम कौशल्य आहे त्यामुळं त्याबाबत आम्हाला कसलीही चिंता नाही. त्यामुळे मानसिक आणि तांत्रिक पातळीवर त्यांना तयार ठेवणं गरजेचं आहे, तसं झाल्यास आम्ही उत्तम खेळ करू."
नेदरलँड्सचा खेळाडू बास द लीडे म्हणाला की, "आम्हाला काहीही करून सेमिफायनल गाठायची आहे. त्यासाठी चार ते पाच विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे काही प्रमुख संघांचा पराभव करणं आमच्यासाठी गरजेचं आहे."
 





Published By- Priya Dixit
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Asian Games Medals : भारताची एशियाडमधील सर्वोत्तम कामगिरी, भारताच्या झोळीत एकूण 95 पदके