सध्या विश्वचषकात भारतची खेळी चांगली आहे. भारत सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. या दरम्यान एम एस धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये धोनी ने आपल्या फेंस ला एक सरप्राईज गिफ्ट देताना दिसत आहे.
माजी कर्णधार एम एस धोनी हा सर्वांचा लाडका असून त्याचे क्रेज सर्वानाच आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये धोनी आपल्या चाहत्याला एका खास पद्धतीने ऑटोग्राफ देताना दिसत आहे. या व्हिडीओ मध्ये धोनी चाहत्यांच्या बीएमडब्ल्यू कारवर ऑटोग्राफ देताना दिसत आहे. या साठी त्याने एका पेनची निवड केली आहे. आता सही कशी करू असेही तो या व्हिडीओ मध्ये बोलत असताना ऐकू येत आहे.
धोनीची क्रेज सर्वांनाच आहे. आयपीएल नंतर धोनी पुन्हा 2024 मध्ये मैदानात दिसणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीनंतर धोनी निवृत्ती घेणार अशी चर्चा सुरु होती. मात्र तसे झाले नाही. आता धोनी पूर्णपणे फिट असून लवकरच मैदानात दिसणार.