Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Global ambassador of World Cup 2023 तेंडुलकर वर्ल्ड कपचा ग्लोबल एंबेसडर बनला आहे

sachin tendulkar
, बुधवार, 4 ऑक्टोबर 2023 (10:53 IST)
Global ambassador of World Cup 2023 : ICC ने क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची विश्वचषक 2023 साठी ग्लोबल अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. आयसीसीने सचिनची भारतातर्फे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. मेन इन ब्लूने शेवटच्या वेळी भारतामध्ये वर्ल्ड कप फायनल जिंकून ट्रॉफी जिंकली होती. या संघात सचिनचाही समावेश होता. यावर्षी भारताला 12 वर्षांचा दुष्काळ संपवायचा आहे.
 
आता एकदिवसीय विश्वचषक सुरु होण्यासाठी फक्त 1 दिवस उरला आहे. मेगा इव्हेंटचा ग्लोबल अॅम्बेसेडर बनलेल्या सचिनने आपल्या कारकिर्दीत सहा वर्ल्डकपमध्ये भाग घेतला आहे. जागतिक राजदूत सचिन तेंडुलक उद्घाटनाच्या सामन्यापूर्वी स्टेडियममध्ये विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण करतील. सचिन येथे ट्रॉफी सादर करताना दिसेल आणि त्याची घोषणा करून स्पर्धेची सुरुवात करेल.
 
सचिन तेंडुलकर म्हणाला, “1987 मध्ये बॉल बॉय बनण्यापासून ते सहा आवृत्त्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत विश्वचषकाने माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान ठेवले आहे. 2011 मध्ये विश्वचषक जिंकणे हा माझ्या क्रिकेट प्रवासातील सर्वात अभिमानास्पद क्षण आहे. "आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारतामध्ये अनेक विशेष संघ आणि खेळाडू जोरदार स्पर्धा करण्यासाठी सज्ज असल्याने, मी या महान स्पर्धेची उत्सुकतेने वाट पाहत आहे." 
 
"विश्वचषक सारख्या मोठ्या स्पर्धा तरुणांच्या मनात स्वप्नांची बीजे रोवतात, मला आशा आहे की ही आवृत्ती तरुण मुली आणि मुलांना खेळात सहभागी होण्यासाठी आणि उच्च स्तरावर त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रेरित करेल," तेंडुलकर म्हणाला.
 
वर्ल्ड कपचा पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याच्या एक दिवस आधी विश्वचषकाचा उद्घाटन सोहळाही आयोजित केला जाणार आहे. कॅप्टन डे आणि हा सोहळा या स्टेडियममध्ये 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या समारंभात सर्व संघांचे कर्णधारही सहभागी होणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Road Accident कार आणि ट्रकची धडक, भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू