Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ind Vs Pak : भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानविरुद्ध रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदवले

Ind Vs Pak : भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानविरुद्ध रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदवले
, रविवार, 15 ऑक्टोबर 2023 (13:15 IST)
Ind Vs Pak : विश्वचषकात भारतीय गोलंदाज उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी पाकिस्तानविरुद्ध शार्दुल ठाकूर वगळता प्रत्येक भारतीय गोलंदाजाने 2-2 विकेट्स घेतल्या. यासह भारतीय गोलंदाजांनी रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे. 
 
नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करताना 42.5 षटकात 191 धावा केल्या आणि सर्वबाद झाले. एकदिवसीय विश्वचषकात पाच गोलंदाजांनी एका डावात 2-2 विकेट घेण्याची ही तिसरी वेळ आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. 
 
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 5 गोलंदाजांनी एका डावात 2-2 विकेट्स घेण्याचा पहिला पराक्रम 2011 मध्ये केला होता. 2011 च्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाच गोलंदाजांनी 2-2 विकेट घेतल्या होत्या. 2015 मध्ये, क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्यात 5 गोलंदाजांनी 2-2 विकेट घेतल्या होत्या. एकदिवसीय विश्वचषकात भारताविरुद्ध पाकिस्तानची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी 1999 मध्ये पाकिस्तानी संघ 180 धावांत गारद झाला होता
 








Edited by - Priya Dixit    
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Benglore : इंजिनिअर ने केली 854 कोटींची मेगा फसवणूक, पोलिसांनी अटक केले